* कविता..
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं , तर किरवाणी म्हणजे पोपटाची गाणे. माणसाकडे पाहूनही कधी कधी असच वाटू लागतं, कि आपणही पोपटच.पिंजऱ्यात अडकलेले.तितकेच हतबल आणि तितकेच लाचार.पोपट बाहेर पडायला धडपडत असतो…तडफडत असतो.पिंजऱ्याचं दार उघडण्याकरिता.
आणि तसं पाहिलं, तर पोपटाला बाहेर पडणं फार अवघड नसतं. कधी कधी मालक विसरून जातो….पिंजऱ्याच्या दाराला चिंता घालायला…पण माणसाचा मालक फार चतुर आहे…त्याने घट्ट चिमटा लावून ठेवला आहे….त्यामुळे, माणसाची वाट अजूनच बिकट झाली आहे…
मला नितांत आदर वाटतो…या पिंजऱ्याबद्दल, त्याला चिमटा घालणाऱ्याबद्दल. या पिंजऱ्यात बसलेल्या तुम्हा-आम्हांबद्दल.
या पिंजऱ्यातल्या प्रत्येक पोपटाचे स्वतःचे गाणे आहे……प्रत्येकाची एक किरवाणी असते……ही पण अशीच एक किरवाणी…एका वेड्या राघूची……..
उघडे पडले द्वार पिंजऱ्याचे……..
आतील राघू नाही ठिकाणी……..
आत उरली फोड पेरूची…….
अन् एक किरवाणी……..
-मंदार कारंजकर
Leave a Reply