एक अचानक सुचलेली मराठी कविता …..
कमळाचे हे दव बिंदू असतीलही त्याचे अश्रू…..
काटेरी दु:खाची रुपेरी किनार
लक्ष वेधते साऱ्यांचे.
फुलांना डोलाविण्याचे साऱ्यांना
कृत्य दिसते वाऱ्याचे
बाम्बुबनातील हुंकार
हेच वाऱ्याचे अश्रू
अन् कमळाचे हे दव बिंदू असतीलही त्याचे अश्रू….
झळाळणाऱ्या चंद्रालाही
असतात विवर काळे
अन् ती झळाळी
झाकते त्याचे उमाळे
क्षणोक्षणी तुटणारे तारे
हेच चंद्राचे अश्रू
अन् कमळाचे हे दव बिंदू असतीलही त्याचे अश्रू….
Leave a Reply