ही स्पंदने कोणाची? थोडी ओळखीची…
डूबलो हिच्या नादात, ही मंद धून कोणाची?
शोध घेता घेता, तो लागताच हाती,
होते शांत जाणीव- ही तर सावलीच त्याची…
एका शांत तळ्यात होती त्याचीच मूर्ती….
एक तरंग अशांतीची, साऱ्या मुर्त्या विरती….
या इथे या क्षणी, जाणवतो श्वास त्याचा….
अन् क्षणी पुढच्या, वासना किरकिरती
या इथे, या क्षणी, तो दिसतो साऱ्या ब्रह्मांडी,
अन् क्षणी पुढच्या, सुनी सुनी ही धरती..
कुठे दूर प्रकाश दिसता मन घेते शोध तुझ्या उश्मेचा…
अन् क्षणात उघडती डोळे, हा तर खेळ काजव्यांचा…..
Leave a Reply